
सावर्डे : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) यांचे संयुक्त विद्यमाने गोविंदरावजी निकम काॅलेज आॅफ फार्मसी, सावर्डे येथे भव्य रानभाजी महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त विविध रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम यांचे हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास सावर्डे पंचक्रोशीतील महीला , शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यी व महीला कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.उपस्थित महीला वर्गाला रानभाजयांचे महत्व व त्यांचे ओषधी गुणधर्म याविषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॅ.ओंकार निर्मळ यांनी उपस्थित महीलांना याविषयी मार्गदर्शन केले.पाककला स्पर्धेमध्ये सुप्रिया पुनवत यांनी प्रथम, श्रेया पवार हीने द्वितीय तर जान्हवी चव्हाण हीने तृतीय क्रमांक पटकावला व पोस्टर्स प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये अंजली जाधव हिने प्रथम, सृष्टी देसाई हिने द्वितीय व प्रिती शिंदे हिने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व विजयी स्पर्धकांचा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, तालुका कृषि अधिकारी श्री.म्हेत्रे ,प्रा.हरिश्चंद्र भागडे व अनिरुद्ध निकम यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.उपस्थित सर्व स्पर्धक व महीला वर्गाचे आमदार शेखर निकम यांनी कौतुक केले व रानभाज्यांचे महत्व तरुण पिढी पर्यत पोहोचविण्याचे आवाहन केले.या स्पर्धेसाठी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.वाकचौरे व अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रिया सकपाळ यांनी परिक्षक म्हणुन काम पाहीले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका स्मिता जाधव , शत्रुघ्न म्हेत्रे - तालुका कृषी अधिकारी श्रीमती डॉ. ज्योती यादव .तालुका आरोग्य अधिकारी सागर निकम जिल्हा संसाधन व्यक्ती पंकज कोरडे तालुका समन्वयक आत्मा, चिपळूण यांनी विशेष परिश्रम घेतले.