रत्नागिरीत राणेंचा रूबाब | हजारोंच्या उपस्थितीत भरली उमेदवारी

Edited by: विनायक गांवस
Published on: April 19, 2024 09:36 AM
views 1159  views

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्ते रत्नागिरीनगरीत दाखल झाले होते. महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या तुफान गर्दीत राणेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अडिच लाखांहून अधिकच्या मताधिक्यान निवडून येणार असल्याचा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांची मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य रॅली झाली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहभागी झाले होते. रॅलीत केंद्रीय मंत्री उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत,राष्ट्रवादी आमदार निकम,माजी खासदार निलेश राणे,भाजप आमदार नितेश राणे, शिवसेना नेते किरण भैया सामंत, माजी आमदार बाळ माने, माजी अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली,बँक अध्यक्ष मनिष दळवी,प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महायुतीचे दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आदींसह भारतीय जनता पार्टीचे दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.