सावंतवाडी पतपेढीच्या नूतन अध्यक्षपदी रमेश बोंद्रे..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 15, 2024 09:12 AM
views 99  views

सावंतवाडी : सावंतवाडी सहकारी पतपेढीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनची निवड आज निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. आरावंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सावंतवाडी पतपेढी नूतन अध्यक्षपदी रमेश बोंद्रे तर उपाध्यक्षपदी अँड. संजू शिरोडकर यांची निवड  निवड करण्यात आली. याप्रसंगी विद्यमान संचालक अॅड. गोविंद बांदेकर, रमेश बोंद्रे, उमाकांत वारंग, दत्ताराम सावंत, शरद सावंत, चंद्रकांत शिरोडकर, देवेंद्र तुळसकर, यल्लापा नाईक, सदानंद जाधव, सौ. सीमा मठकर, सौ. मनिषा मिशाळ, सौ. किशोरी कुडतरकर, श्रीमती वैष्णवी बांदेकर आदी उपस्थित होते.