रामचंद्र परबांची शिवसेनेत घरवापसी

Edited by: विनायक गांवस
Published on: December 11, 2025 18:12 PM
views 162  views

सावंतवाडी : कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे कुणकेरी येथील बूथ प्रमुख रामचंद्र परब यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करत घर वापसी केली. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. 

कुणकेरी येथील रामचंद्र परब यांनी आपण गटातटाच्या राजकारण आणि कारभाराला कंटाळून पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. यापुढे कुणकेरी गावामध्ये शिवसेनेला बळकटी देण्यासाठी आपण काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी जिल्हाप्रमुख श्री परब यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले. तसेच पक्ष सर्वतोपरी तुमच्या मागे उभा राहील असे आश्वासन दिले. यावेळी उपतालुकाप्रमुख राकेश पवार, अक्षय पार्सेकर यांच्यासह कुणकेरी विभागप्रमुख महेश सावंत, झेवियर फर्नांडिस, अमर कुणकेरकर, किरण तेंडुलकर, दीपक पार्सेकर, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.