भीम गीत स्पर्धेत रमाई कलाविष्कार मडुरा प्रथम

Edited by:
Published on: April 07, 2025 11:59 AM
views 118  views

सावंतवाडी : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडी यांनी दरवर्षीप्रमाणे आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या समूह गान भीम गीत स्पर्धेत रमाई कलाविष्कार मडुरा यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर निरवडे महिला समूह द्वितीय आणि सिद्धार्थनगर ग्रुप नेमळे तृतीय ठरला.             

ही स्पर्धा रविवारी बॅरिस्टर नाथ सभागृहt प्रचंड उत्साहात संपन्न झाली .या स्पर्धेत 15 संघाने भाग घेतला होता स्पर्धेचे उद्घाटन माजी पंचायत समितीचे उपसभापती तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते व शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांच्या उपस्थितीत पार पडली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर  या होत्या. यावेळी उपाध्यक्ष जगदीश चव्हाण कवी तथा सांस्कृतिक व साहित्य महामंडळाचे सदस्य विठ्ठल कदम परीक्षक अनिल आचरेकर , महेश तळगावकर ,कविता निगुडकर, नरेश  कारवडेकर, पत्रकार मोहन जाधव इत्यादी उपस्थित होते.

प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. समितीचे खजिनदार सुनील जाधव यांनी समन्वय समितीच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला .        यावेळी श्री दळवी  यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व संघटना एकत्र येत बाबासाहेब आंबेडकर यांची ही संयुक्तपणे जयंती साजरी करतात ही बाब निश्चितच कौतुकास्पद  व प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या समाजात अनेक दिग्गज नेते असूनही समाजाच्या एका झेंड्याखाली काम करतात ही बाब स्तुत्य असून अशा स्पर्धेतून समाजाचे केवळ मनोरंजन न होता प्रबोधनही व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व शुभेच्छा  दिल्या. यावेळी मीनाक्षी तेंडुलकर यांनी व विठ्ठल कदम यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी सगुण जाधव यांनी आभार व्यक्त केले. 

या उद्घाटन सोहळ्यानंतर पार पडलेल्या भीम गीत स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे असुन प्रथम क्रमांक  रमाई कलाविष्कार मडुरा   रुपये 5000 व स्मृतिचिन्ह रुपये  रश्मी सुशांत चौकेकर पुरस्कृत द्वितीय द्वितीय - निरवडे महिला समूह निरवडे  रु  ३०००/-आनंद कदम पुरस्कृत तृतीय क्रमांक  ,_सिद्धार्थ नगर ग्रुप नेमळे रोख रुपये २०००/. पुरस्कृत सद्गुरु जाधव व अर्चना जाधव उत्तेजनार्थ प्रथम १)पंचशील महिला समूह सरमळे  रुपये 1000 अनंत शिवराम कदम पुरस्कृत उत्तेजनार्थ २)  एकता महिला समूह मळगाव  १००० रुपये पुरस्कर्ते अनंत शिवराम कदम शिवाय या सर्व पुरस्कार विजेत्या संघाला राजेंद्र कृष्णा जाधव यांनी स्मृतिचिन्ह पुरस्कृत केली होती. या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी जाधव यांनी केले होते.   या स्पर्धेत खालील संघाने बहारदार भीम गीते सादर केली.       

१) निरवडे महिला समूह निरवडे यांनी उघडलाच नाही काळाराम २) अनमोल महिला समूह माजगाव यांनी मी वादळ वारा३) सिद्धार्थनगर ग्रुप नेमळे यांनी भीम माझा होता दिलदार ४) सावित्रीबाई फुले महिला समूह मळगाव यांनी माझ्या पदी भीमा वाहिली फुले ५) रमाई महिला ग्रुप डिंगणे  यांनी माझ्या भिमराया ची वाणी ६)सूर्य क्रांती महिला समूह नेमुळे यांनी या माझ्या दलित बांधवानो ७) माता रमाई समूह सांगली यांनी सोनियाची उगवली सकाळ ८)पंचशील महिला सातारा याने प पाहिले चित्र गौतमाचे   ११) आम्रपाली संघ बांदा यांनी काळाराम मंदिर चवदार तळे १२) रमाई कलाविष्कार मडरा यांनी भीमाने दिले आज संविधान १३) रमाई स्वयं महिला समूह सातारला यांनी कुंभारी परी १४) भिमाची आज्ञा मोडू नका  . .     दरम्यान जिल्ह्यातील आघाडीचा युवा कलाकार राहुल कदम यांनी रमाईची साडी हा बहारदार मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला त्या कार्यक्रमातून सुकन्या शशिकांत जाधव सातार्डा यांनी रमाईची साडी प्राप्त केली त्यांना मान्यवरांच्या हस्ते ही साडी प्रदान करण्यात आली. दरम्यान या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी कांता जाधव ,लाडू जाधव अनिल जाधव, केशव जाधव ,विनायक जाधव, तिळाजी जाधव, सद्गुरु जाधव ,आदेश जाधव, सुरेश जाधव, शितल जाधव  इत्यादीni विशेष कष्ट घेतले .सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण 14 एप्रिल रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थिती करण्यात येणार आहे.