श्री पंचमुर्ती महापुरुष देवस्थानमध्ये रामनवमी उत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: March 24, 2026 16:17 PM
views 16  views

सावंतवाडी : शहरातील शिल्पग्राम जवळील स्व. दाजी दळवी यांच्या घरानजीक असलेल्या श्री पंचमुर्ती महापुरुष देवस्थान येथे रामनवमी उत्सवानिमित्त गुरुवार 26 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सायंकाळी सात वाजता सावंतवाडीतील घे भरारी फाउंडेशन प्रस्तुत महिला दशावतार कृष्ण भोजन हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.

रामनवमी उत्सव निमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी एक वाजता महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर तीर्थप्रसाद, भजन व सात वाजता महिलांचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून रामनवमी उत्सव महाप्रसाद व  नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन तेथील शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ सावंतवाडी यांनी केले आहे.