
वैभववाडी : सांगुळवाडी येथील श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार मठात उद्या, ता.०६ श्री राम जन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमात्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या जन्म उत्सव सोहळ्यानिमित्त स. ६.३० ते ११.००.वा. पर्यंत दैनंदिन पूजा पाठ,स. ११.३० ते१२.१० श्री राम जन्म व्याख्यान, दुपारी १२.१५ वा. श्री राम जन्म सोहळा, दु .१.२० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ०१.३०.वा. महाप्रसाद,रात्रौ ८:३०ते १०:३०वा मिळंद येथील आयरे मंडळीकडून पालखी मिरवणूक सोहळा, रात्रौ ठिक ११ जांभवडे येथील श्री नवतरुण विकास भजन मंडळ यांचे दिंडी भजन होणार आहे.या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट यांच्याकडून करण्यात आले आहे.