पडेलमध्ये तिरंगा रॅली...!

Edited by:
Published on: May 19, 2025 16:52 PM
views 44  views

देवगड : पडेलमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या  पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने पड़ेल मंडल मध्ये पडेल ते गिर्ये रामेश्वर अशी तीरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी पड़ेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, आरिफशेठ बगदादी, संजय बोंबडी, रवि पाळेकर, रवि तिरलोटकर, पडेल सरपंच भुषण पोकळे, संजना आळवे, गिर्ये सरपंच लता गिरकर, रामकृष्ण जुवाटकर, अंकुश ठुकरूल, वाडा सरपंच सुनील जाधव, उपसरपंच विष्णु राणे, अजित मुळम, विकास देवळेकर, मूर्गेश राणे आदि नागरिक उपस्थित होते.

यावेळी पडेल मध्ये तिरंगा रॅलीत ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर जयघोष करण्यात आला. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. भारतमाता की जयच्या घोषणानी संपूर्ण परिसर दुमदुमला.