
चिपळूण : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचे मतदारसंघातील वर्चस्व ताकदीचे प्रदर्शन आणि शह- काटशह राजकारण सुरु झाले आहे. याच राजकारणाचा एक भाग असलेली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार, प्रशांत यादव यांच्या आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या चिपळूण सभेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने चिपळूण शहर, बाजारपेठ-खेर्डी आदी परिसरात ही रॅली काढण्यात आली. पक्षाचेे 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह असलेले झेंडे लावूून शेकडो दुचाकी, रिक्षा ,चारचाकी शेकडो चालक महिला- पुरुष, पक्षाच्या आणि प्रशांत यादव यांच्या नावाच्या घोषणा देत रॅलीत सहभागी झाले होते.