नेवगी कुटुंबियांना राज्य प्राथ. शिक्षक समिती सावंतवाडीचा मदतीचा हात !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 07:23 AM
views 66  views

सावंतवाडी : तालुक्यातील इन्सुली गावात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इन्सुली नंबर दहा या शाळेतील विद्यार्थीनी दृष्टी दीपक नेवगी हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्या राहत्या घराला विजेच्या शॉर्टसर्किट मुळे आग लागली होती व त्यात या नेवगी कुटुंबाचं अतोनात नुकसान झाले होते. या मुलीचे वडील दीपक नेवगी हे मोलमजुरी करून चरितार्थ चालवतात.

            

नेवगी कुटुंबावर ओढवलेल्या या संकटात एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सावंतवाडीने आर्थिक स्वरुपात मदतीचे आवाहन केलेले होते, त्याला समिती शिलेदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ही जमा रक्कम  शिक्षक समिती सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर जाधव यांनी दीपक नेवगी यांच्याकडे आज सुपूर्द केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक अध्यक्ष नारायण नाईक, म. रा. प्राथ. शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा सचिव तुषार आरोसकर,सावंतवाडी सचिव हेमंत सावंत, तसेच गोविंद शेर्लेकर, प्रसाद डेगवेकर,  सुधीर गावडे, प्रसाद दळवी, इन्सुली दहा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सुषमा गावडे आदी समिती शिलेदार उपस्थित होते.