
सावंतवाडी : धाकोरे गावातील शाळांना राजू नाईक (आरोस) रा.मुबई,सावंतवाडी,शिवसेना संपर्क प्रमुख (उबाठा)तसेच राजू नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू नाईक यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव, शाळेतील शिक्षक अर्जुन रणशूर, श्रीम.आरोंदेकर, प्रणिता भगत, श्रीम.नार्वेकर आदी उपस्थित होते. धाकोरे गावातील शाळेतील मुलांना राजू नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी राजू नाईक यांनी बोलताना सांगितले की ,गेले अकरा वर्ष आपण राजू नाईक प्रतिष्ठान च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी करत आहोत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच, आपल्या शिक्षकांचं ऐकावं. अभ्यास करून आपण मोठ व्हायचं.शाळेचं गावाच नाव मोठ करायचं तसेच कुठलीही मदत हवी असल्यास आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव यांचं त्यांनी विशेष कौतुक करत, त्यांनी आपल्याला या शैक्षणिक साहित्याबाबत फोन करून सांगितल.त्यांच्या मागणीला आपण लगेच प्रतिसाद देत आपल्या प्रतिष्ठान मार्फत हे शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी आभार व्यक्त केले.