सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब - युवराजांनी घेतलं जत्रेनिमित्त रवळनाथाचं दर्शन

'शंभो जय जय श्री रवळनाथ' गीताचं लाँचिंग !
Edited by: विनायक गावस
Published on: November 29, 2023 12:06 PM
views 208  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागृत देवस्थान ओटवणे येथील श्री रवळनाथाचे सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले व युवराज लखमराजे भोंसले यांनी जत्रोत्सव निमित्त दर्शन घेतले. यावेळी श्री रवळनाथाची महती सांगणाऱ्या  "शंभो जय जय श्री रवळनाथ" या भक्ती गीताचं प्रकाशन करण्यात आले.

या गीतासाठी मेहनत घेणाऱ्या व्यक्तींचा सत्कार राजेसाहेबांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर युवराज लखमराजे यांनी जत्रोत्सव निमित्त साकारलेल्या देखाव्याला भेट दिली. ग्रामस्थांचा भेटी घेत चर्चा केली. यावेळी ओटवणे गावातील प्रमुख गांवकर मंडळी उपस्थित होती ‌