
वैभववाडी : साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग यांच्यावतीने दिला जाणा-या सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी वैभववाडी येथील राजेंद्र कदम यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
श्री.कदम हे वैभववाडी तालुक्यात सामजिक क्षेत्रात काम करतात. मैत्रेय दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते काम करीत आहेत. दिव्यांग बांधवासह समाजातील उपेक्षित घटकांसाठी ते सदैव कार्यरत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेत जिल्हास्तरीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. या निवडीनंतर त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.