
वैभववाडी : तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठा गटाचे शाखाप्रमुख राजेंद्र शिवाजी घागरे व अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या उपस्थितीत घागरे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. आमदार राणेंनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे.उबाठाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.आज तिरवडे तर्फ सौंदळ येथील उबाठाच्या शाखा प्रमुखाने पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.आम नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, बंड्या मांजरेकर, अरविंद जांभवडेकर, संदीप नारकर, राजा सरवणकर,प्रदीप नारकर,दाजी पाटणकर,कोकिसरे सरपंच समीक्षा पाटणकर,अतुल नारकर, पप्पू इंदुलकर व पदाधिकारी उपस्थित होते.