राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्गचे आदर्श शिक्षिका - विद्यार्थी पुरस्कार जाहीर !

Edited by: विनायक गावस
Published on: October 20, 2023 13:13 PM
views 70  views

सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग संस्थापक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे आदर्श  शिक्षिका व आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. आदर्श शिक्षिका श्रीमती प्रणिती बाबुराव सावंत . व आदर्श विद्यार्थी विष्णू नामदेव गुरव, शिवम शरद लाड, आदर्श विद्यार्थिनी तेजस्वी शैलेंद्र सगम, गिरजा परशुराम तुंबगी व राज्यस्तरीय ( सांगली )कुराश स्पर्धा सिल्वर मेडल काव्या अमित तळवणेकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .

सावंतवाडी शाळा नंबर  4 येथे शनिवारी सकाळी  11 वाजता हे  पुरस्कार देणार येणार आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जितेंद्र काकासाहेब खानविलकर,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अशोक शिगवण उर्फ अच्चुभाई, संघटक प्रमुख महाराष्ट्र राज्य, नारायण कोळी,उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, चंद्रकांत मामासाहेब धडके, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य  बशीर कुरेशी,  उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,परिक्षीत मामासाहेब खुने, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य  सुप्रसिद्ध गोल्डमॅन राजुदादा मरे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मंगेश लाड, सचिव महाराष्ट्र राज्य, अजय येवले ,सहचिटणीस महाराष्ट्र राज्य गोरख बोबडे, कायदेशीर सल्लागार महाराष्ट्र  प्रकाश कोळी ,कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिन लोखंडे, सहचिटणीस महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, उपाध्यक्ष संदीप नाईक, सचिव ज्ञानेश्वर पारधी, कल्याण कदम,रामचंद्र कुडाळकर, मंगेश माणगावकर, संदीप चांदेलकर आदींच्या माध्यमातून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.