
देवगड : देवगड तहसीलदार कार्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. आरक्षण देणारा पहिला राजा, कला,संस्कृती, क्रीडा,तसेच शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठवणारा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने तहसिलदार संकेत यमगर यांचे हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तहसिलदार यमगर, महसूल नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर,निवडणूक नायब तहसिलदार श्री.मोरे,कर्मचारी वृंद आदिंनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.