राजापूर अर्बन बँकेचा डबल धमाका ; या पुरस्कारांवर उमटवली मोहोर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 05, 2023 15:39 PM
views 170  views

राजापूर : आपल्या सर्वोत्कृष्ठ कामगिरीने कोकणच नव्हे तर राज्यभरात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या राजापूर अर्बन को. ऑप. बँकेने पुन्हा एकदा यावर्षी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई तर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. यावर्षी या पुरस्कारांमध्ये बँकेने डबल धमाका साधला आहे. या संस्थेकडून राजापूर अर्बन बँकेला सन २०२१-२२ साठी आपल्या बँकेची कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार’ तर शतकमहोत्सव साजरा करणारी कोकणातील बँक म्हणून बँकेला या वर्षीचा शतकोत्तर वाटचाल विशेष सन्मान पुरस्कार जाहिर झाला आहे.

  दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर व उपाध्यक्ष वसंत विश्वासराव घुईखेडकर यांच्याकडून बँकेला प्राप्त झाला आहे. बँकेने पुन्हा एकदा या पुरस्कारांवर आपली मोहर उठविल्याबद्दल बँकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. २३ सप्टेंबर २०२३ रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थित या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.