राजापूर मतदारसंघात मविआत बंडखोरी !

अविनाश लाडांचं राजन साळवींना आव्हान
Edited by: मनोज पवार
Published on: November 05, 2024 11:08 AM
views 231  views

राजापूर : राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे.

राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघ काँग्रेसला मिळावा अशी आग्रही मागणी अविनाश लाड यांनी केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून हा मतदार संघ उबाठा गटाला सोडून विद्यमान आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अविनाश लाड यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी लाड आघाडीचा धर्म पाळणार की बंडखोरी करणार याबाबत उत्सुकता होती. मात्र सकाळ पासूनच लाड हे नॉटरिचेबल होते. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडीत राजापूर मतदार संघात बंडखोरी झाली असून याचा फटका कोणाला बसतो आणि फायदा कोणाला होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.