
सावंतवाडी : माजी आमदार, उबाठा शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडून तेली यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान, आज त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याची माहीती समोर येत आहे. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कामासाठी घेतल्याच स्पष्टीकरण तेलींनी दिलं आहे.