राजन तेलींचं निरपेक्ष वृत्तीने काम : विनायक राऊत

Edited by:
Published on: November 10, 2024 15:50 PM
views 298  views

सावंतवाडी : शिंदे गट, भाजपकडून अनेक प्रलोभने दाखवली जात आहे. पण, लोकसभेची चूक लोक मतदार आता करणार नाहीत. तिन्ही विधानसभेत मशालीला साथ देतील. लोकांची दिशाभूल करण्याच काम केसरकर यांनी केलं आहे. याउलट राजन तेली हे निरपेक्ष वृत्तीने, लोकांसाठी काम करणारे, विकासाची दृष्टी असणारे उमेदवार आहेत. त्यामुळे यावेळी विधानसभा मतदारसंघात नक्की परिवर्तन होईल. गेली अनेक वर्षे जिद्दीन मेहनत घेणाऱ्या तेलींना त्याच फळ यावेळी मिळेल असा विश्वास माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, महायुतीचे उमेदवार राजन तेली हे अनुभवी नेते आहेत. अपयश आले तरी जिद्देन ते गेली १५ वर्ष कार्यरत आहेत. त्याच फळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार व नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली ते नक्कीच मिळेल. या मतदारसंघाला ऐतिहासिक परंपरा आहे. शिवरामराजे भोसले, भाईसाहेब सावंत, जयानंद मठकर, प्रवीण भोसले या सर्वांनी ऐतिहासिक परंपरा या मतदारसंघास आहे. मागच्या १५ वर्षांत पोपटपंची करण्याचे काम शिंदे गटाचे उमेदवार, विद्यमान मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. विकासाचा नावाखाली गमजा मारून उद्धव ठाकरे यांच्या काळात आणलेल्या प्रकल्पांवर बसून राहण्याचे काम त्यांनी केलं. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चष्मा कारखाना, एमआयडीसी प्रकल्प शिंदे सरकारला पूर्ण करता आला नाही. त्यात पाणबुडी प्रकल्प गुजरातने यांच्या कारकिर्दीत पळवून नेला. लोकांची दिशाभूल करण्याच काम केसरकर यांनी केलं आहे. राजन तेली हे निरपेक्ष वृत्तीने काम करणारे, लोकांसाठी काम करणारे, विकासाची दृष्टी असणारे उमेदवार आहेत. यावेळी विधानसभा मतदारसंघात नक्की परिवर्तन होईल व राजन तेली मशाल चिन्हावर आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास श्री. राऊत यांनी व्यक्त केला.

तसेच शिंदे गट, भाजपकडून अनेक प्रलोभने दाखवली जात आहे.मात्र, लोकसभेची चूक लोक आता करणार नाहीत. तिन्ही विधानसभेत मशालीला साथ देतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरे यांचा मार्ग रोखणारी ओलांद अजून महाराष्ट्रात जन्माला आलेली नाही.‌ त्यांचा मार्ग रोखण्याआधी नारायण राणेंना आमच्या गाड्यांना सामोरं जावं लागेल. हिंमत असेल तर आमचा मार्ग रोखून दाखवावा असा इशारा दिला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, महिला जिल्हाप्रमुख अँड. जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.