राजन तेली विकासाचे व्हिजन असलेले नेते : आशिष सुभेदार

Edited by: विनायक गांवस
Published on: November 12, 2024 20:55 PM
views 39  views

सावंतवाडी : उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली हे विकासाचे व्हिजन असलेले नेते आहेत. आमदार असताना त्यानी यापूर्वी देखील सावंतवाडी तालुक्याच्या विकासाला हातभार लावलेला आहे. प्रशासनाचा अभ्यास असलेला अनुभवी नेता विधानसभेत पाठवून या भागाच्या विकासाला जनतेने हातभार लावावा असे आवाहन उबाठा शिवसेना पक्षाचे युवा पदाधिकारी आशिष सुभेदार यांनी केला आहे. 


सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत उबाठा शिवसेना पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली हे उभे आहेत. शांत सयंमी असलेले तेली यांनी यापूर्वी सावंतवाडी मतदार संघात चांगले काम केले आहे. विधानपरिषदेचे आमदार असताना त्यांनी या मतदार संघात विशेष लक्ष देत बरीच विकासकामे केली. गावोगावी खेडोपाडी आजही त्यांचा उत्तम संपर्क आहे. वेगवेगळ्या पक्षात काम करत असताना अनेक कार्यकर्त्याशी त्यांचा सबंध आला त्यां कार्यकर्त्यांना त्यानी आजही जपण्याचे काम केले. सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला तालुक्यात उत्तम जनसंपर्क असलेला व विकासाचे व्हिजन असलेला नेता म्हणून श्री तेली यांच्याकडे पाहिले जाते. सलग दोन वेळा अपक्ष निवडणूक लढवून मतदारसंघात आपले काम सुरूच ठेवले. आजघडीला या भागातील अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. विद्यमान आमदार यांनी जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच प्रवृत्तीशी ते पुन्हा हात मिळवणी करीत आहेत हे सर्व जनता जाणून आहे. स्थानिक भूमिपुत्र यांना रोजगार नाही. चांगले रुग्णालय नाही. त्यामुळे त्यांच्या खोट्या आश्वसनांना जनता आता बळी पडणार नाही आता जनता श्री तेली यांच्या पाठीशी आहे. या निवडणुकीत दीपक केसरकर यांच्या आमिषांना जनता भुलणार नाही तर राजन तेली यांच्याच बाजूने कौल देईल असा विश्वास उबाठा शिवसेना युवा पदाधिकारी आशिष सुभेदार यांनी व्यक्त केला आहे.