सावंतवाडी : मी भाजपात प्रवेश करतोय ही चर्चा चुकीची आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना माझ्या मतदारसंघातील महत्वाच्या विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो. त्या ठिकाणी मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली असे स्पष्टीकरण माजी आमदार व उबाठा शिवसेनेचे नेते राजन तेली यांनी दिली आहे.
शुक्रवारी राजन तेली यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते पुन्हा भाजपावासी होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. 'त्या' चर्चांवर आज राजन तेली यांनी पडदा टाकला आहे.