वेळागरातील भगत कुटुंबीयांचा केसरकरांना पाठींबा

राजन तेलींनी गैरसमज पसरवला : दीपक केसरकर
Edited by:
Published on: November 15, 2024 13:54 PM
views 256  views

सावंतवाडी : वेळागर येथील ते आंदोलन गैरसमजातून झाले होते. जसा सर्वे नं ३९ चा प्रश्न सोडवला तसाच सर्वे नं २९ चाही सोडवू, कोणती जमीन सोडवायची हे निश्चित होईपर्यंत तेथे बांधकाम होणार नाही. युवकांना ट्रेनिंग देण्यात येणार असून ताजमध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. लवकरच मी या गावामध्ये जाणार असल्याचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. आज येथील भगत कुटुंबाकडून दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

वेळागर येथील भगत कुटुंबीयांनी श्री. केसरकर यांना पाठींबा दर्शविला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबन बागकर, उदय भगत, प्रिती भगत, समीर भगत, अशोक भगत, श्याम भगत, सुनील दुबळे, अंकिता भगत, सूनैना भगत आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, वेळागर येथील ते आंदोलन गैरसमजातून झाले होते. गैरसमज पसरवण्याचे काम राजन तेलींनी केले. या ग्रामस्थांवरील पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मी मागे घेण्यास सांगितले. जसा सर्वे नं ३९ चा प्रश्न सोडवला तसाच सर्वे नं २९ चाही सोडवू. कोणती जमीन सोडवायची हे निश्चित होईपर्यंत कोणतेही बांधकाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.