
वेंगुर्ला : महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी वेंगुर्ला तालुक्यात प्रचाराला सकाळपासूनच सुरुवात केली आहे. यावेळी त्यांना परुळे बाजारातील व्यापाऱ्यांसह चीपी कुशेवाडा, गाऊडवाडी ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. तर केसरकरांनी याठिकाणी कोणताही विकास केलेला नाही निवडून आल्यानंतर पाच वर्षात या गावात फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे यावेळी आपण श्री तेली यांच्या पाठीशी उभे राहून जास्तीत जास्त मताधिक्य देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, वसंत साटम, अजय सारंग, नीलेश परुळेकर, मनोहर येरम, वासुदेव माधव, लवू मेस्त्री, विजय गोलेकर, विश्वनाथ म्हापनकर, अभय परुळेकर, पंकज शिरसाट, अशोक पाटकर, जयवंत राऊळ, रोहित म्हापणकर आदी उपस्थित होते.
श्री तेली यांनी घरा घरात जाऊन प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. केसरकरांन विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली. तर विविध गावातील समस्या श्री तेली यांच्यासमोर मांडल्या.यावेळी नक्कीच गावच्या विकासासाठी मी प्रयत्न करीन असे तेली यांनी सांगितले.