शिरोड्यातील ताज प्रकल्प वेळावर प्रश्नी राजन तेली मैदानात | भूमीपुत्रांची घेतली भेट

Edited by: दिपेश परब
Published on: October 05, 2023 11:36 AM
views 175  views

वेंगुर्ला : शिरोडा वेळागरवाडी येथे शासनाकडून ताज ग्रुप हाॅटेल प्रकल्पाची जमीन संपादन करण्यासाठी सर्व्हे सुरु असताना येथे लोकवस्ती असलेल्या ग्रामस्थांनी सर्व्हे करण्यास विरोध केला. या विरोधामुळे सर्व्हे करणाऱ्याना शासकीय अधिकारी व ताज ग्रुपच्या व्यक्तींना माघार घ्यावी लागली होती. याबाबत स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे होते की, त्यांचा लोकवस्ती परिसर धरून ९ हेक्टर जागेचे भूसंपादन करु नये व तेवढी जागा सोडून बाकीच्या जागेत ताज प्रकल्प उभा राहीला तर त्यांचा विरोध नाही. मात्र शासनाने लोकवस्ती चा सर्व्हे करायला सुरु केल्यामुळे तेथील स्थानिक जनता एकत्र झाली व प्रखर विरोध केला. 

ही बाब येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या कानावर घातल्यानंतर बुधवारी ४ आँक्टोबर रोजी माजी आमदार  राजन तेली यांनी स्थानिक रेडी जि.प.भाजप पदाधिकारी, व लोकप्रतिनिधी यांच्या सह शिरोडा वेळागर येथील ग्रामस्थाना भेट दिली.

या वेळी शिरोडा वेळागरवाडीतील ग्रामस्थांकडून वरील सर्व विषय व मागील सर्व पार्श्वभूमी समजून घेतली व तेथील ग्रामस्थांसोबत लोकवस्तीचा संपुर्ण परिसर फिरून सर्व परिसराची माहिती घेतली. या प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय मांडू त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन याना विनंती करुन येथे आणण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा  ग्रामस्थांना घेऊन त्यांची भेट घडवून त्यांना विषय सांगून त्यांच्याकडून निक्कीच ग्रामस्थांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच प्रमाणे स्थानिक भूमीपुत्रांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहू हे यावेळी राजन तेली यांनी स्थानिकांना दिले.यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश तेली, जि प चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य मयूरेश शिरोडकर, भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,  शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, बाबा नाईक, मनोज उगवेकर, शक्ती केंद्र प्रमुख विदयाधर धानजी, महादेव नाईक, विजय बागकर, जगन्नाथ राणे, शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, शहर पदाधिकारी मनोहर होडावडेकर, चंद्रशेखर गोडकर, योगेश वैदय, रेडी,सागरतीर्थ, भाजप पदाधिकारी महेश कोनाडकर, ज्ञानेश्वर केरकर, बाळू वस्त, शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, भाजप सदस्य कमलेश गावडे, स्थानिक ग्रामस्थ तथा माजी  ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे, ग्रामस्थ राजेंद्र आदुर्लेकर, वासुदेव आरोस्कर, हनुमंत गवंडी, मनोहर नाईक, उत्तम आरोस्कर, विनोद आरोस्कर, आदित्य गवंडी, श्रेयस केरकर, दाजी आरोस्कर यांच्यासाहित सुमारे ५० ते ६० ग्रामस्थ उपस्थित होते.