
वेंगुर्ले : तालुक्यातील रेडी येथे नागरी सुविधा अंतर्गत मंजूर झालेल्या रेडी ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरण, ग्रामपंचायत वाचनालय व विद्युत वितरण कार्यालयाचे उदघाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते १७ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, माजी पं.स. सदस्य मंगेश कामत, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, सदस्य रश्मी रेडकर, शमिका नाईक, रिचा सावंत, मानसी राणे,आनंद भीसे, गणेश भगत, स्वप्नील राणे, सागर रेडकर, विनोद राणे, प्रज्ञा राऊळ, विद्युत महावितरणचे कनिष्ठ अभियंता पेडणेकर, रेडी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर राऊळ, नंदू मांजरेकर, जगन्नाथ राणे, महेश कोनाडकर, ज्ञानेश्वर केरकर, अरुण राणे, गायत्री सातोस्कर, संजय कांबळी, शैलेश तिवरेकर, पत्रकार आना सातार्डेकर, सायर जेरोल यांच्यासाहित ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.










