
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या गोटातून जोरदार हालचाली सुरू असताना डझनभर इच्छुक एकाच पक्षातून असताना भाजपकडून इच्छुक असलेले माजी आमदार राजन तेली यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तब्बल पाऊण तास दोघांत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
राजन तेली हे सावंतवाडी विधानसभेतून इच्छुक आहे. मित्रपक्षाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर तोंडसुख घेण्याची एकही संधी ते सोडत नाही आहेत. काहीही झालं तर केसरकरांच काम करणार नाही. विधानसभा लढवणारच असा चंग बांधून ते मैदानात उतरले आहे. अशातच, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. पाऊळतास दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र करू शकले नाही. या भेटीच्या वृत्तामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षश्रेष्ठी सावंतवाडी मतदारसंघाबाबत विशेषतः राजन तेलींबाबत काय निर्णय घेतात ? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहीली आहे.