राणेंपेक्षा राजन म्हापसेकर मोठा कार्यकर्ता ?

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांचं खळबळजनक वक्तव्य
Edited by: संदीप देसाई
Published on: February 23, 2023 20:03 PM
views 558  views

दोडामार्ग : राणे व सुरेश दळवी यांना आपण पुरून उरलो, असे म्हणणारा राजन म्हापसेकर नारायण राणेंपेक्षा दोडामार्ग तालुक्यातील मोठा कार्यकर्ता आहे? अशी उपरोधिक टीका करीत आपल्याच पक्षात राहून वेळोवेळी गद्दारी व पक्षविरोधी काम करणाऱ्या म्हापसेकर यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये, असा पलटवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी केला आहे.  म्हापसेकर यांनी आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिवसेनेच्या निंबाळकर, गणेशप्रसाद गवस व गोपाळ गवस यांच्यावर केलेल्या आरोपाविरोधात गुरुवारी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेत या तिघांनीही प्रत्युत्तर दिले. यावेळी शैलेश दळवी, भगवान गवस व रामदास मेस्त्री उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस व सर्वांनीच म्हापसेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर केलेल्या आरोपांचे सुद्धा जोरदार खंडन करीत म्हापसेकर यांनी बेछूट आरोप करण्यापेक्षा आपण आत्मपरीक्षण करावे व मग आमच्या नेत्यांवर व आमच्यावर आरोप करावेत, असा इशारा दिला आहे. 

आपण ३३ वर्षे एकाच पक्षात आहे, हे राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगू नये. दोडामार्ग नगरपंचायत व दोडामार्ग पंचायत समिती सत्ता येऊनही आपले सदस्य दुसऱ्या पक्षाला कोणी विकले हे सर्वांना माहीत आहे, यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. ज्यांनी आपल्या विकास कामांवर लिहिणाऱ्या पत्रकारांना धमकावले, आणि आपण राणे व सुरेश दळवी यांना पुरून उरलो असे वक्तव्य केले. त्याची ऑडिओ क्लिप ही आपल्याकडे असल्याचे सांगत म्हापसेकर यांच्यावर टीकास्त्र डागले.  १५ वर्षात आपल्या मतदारसंघात एक तरी विकास कामांचा नारळ फोडला का? आज मूळ भाजपाचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत का ? असा सवाल करत म्हापसेकर यांनी आत्मपरीक्षण करावे, असे सांगितले. 

हेवाळे पुलाच्या टेंडरबाबत  भरण्याचे नैतिक अधिकारच नाही. त्यावेळी वाहून गेलेले पूल मी फ्री ऑफ कॉस्ट २० लाख खर्चून बांधून दिले. पुलासाठी इतकी उपोषण झाली, त्यावेळी हे कुठे होते? आपल्याला मिळालेले टेंडर नियमास धरूनच आहे. आजपर्यंत केलेली कामे जलसंपदा विभागाची असल्याने आम्ही लोकांसाठी काम करतोय असे सांगितले.

 तर गोपाळ गवस यांनीही त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करताना म्हापसेकर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊनच प्रत्युत्तर दिले. बुडीत क्षेत्रात फळ झाडांची नुकसानी लाटणाऱ्या म्हापसेकरांच्या चौकशीची आम्ही मागणी करणार असल्याचे सांगितले. 

तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी म्हापसेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व यांच्यावर केलेले आरोपांचे जोरदार खंडन केले. दीपक केसरकर यांनी कधीही कुठच्याही ठेकेदारांना काम देण्याबाबत कुठच्याही कार्यालयाकडे हस्तक्षेप केला नाही. उलट केसरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोठे केले नाही, असाच आरोप आजवर त्यांनी पक्षांतील कार्यकर्त्यातून सहन केला आहे. त्यामुळे आपली बाजू सावरण्यासाठी मंत्री केसरकर यांना म्हापसेकर यांनी नाहक बदनाम करण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे. आमची परवाची प्रेस ही केवळ राजकीय आणि समाजाशी निगडित असलेल्या आरोग्य केंद्र इमारत उद्घाटन विषयावर होती, मात्र म्हापसेकर यांनी ती वैयक्तिक पातळीवर घेत मर्यादा सोडून वैयक्तिक पातळीवर टीका केली. वास्तविक म्हापसेकर यांनी बोलताना मर्यादा पाळून बोलणे आवश्यक असताना तस न करता म्हापसेकर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली. या गोष्टीचा गणेशप्रसाद गवस यांनी जाहीर निषेध केला.