
देवगड : देवगड पोलीस स्टेशन मधील राजन जाधव यांची हवालदार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. देवगड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार व नारिंग्रे गावचे सुपुत्र राजन जाधव यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना पोलीस हवालदार पदावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदी बढती मिळाली आहे. त्याबद्दल त्यांना प्रजासत्ताक दिनी जिल्हा पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग येथे माननीय पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. तसेच देवगड पोलीस ठाण्यामार्फत पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व सर्व देवगड पोलीस दलामार्फत त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.