
वेंगुर्ला : श्रावण मासाचे औचित्य साधून श्री पूर्वीदेवी मंदिर तळवडे-आंबाडेवाडी येथे उद्योजक राजाराम आ. गावडे आणि परिवार यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे शुक्रवार दि. ०८ सप्टेंबर २०२३ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानिमीत्ताने श्री पूर्वीदेवी मंदिराच्या आलिशान रंगमंचावर सायं. ठीक ६.३० वा. स्वरधारा भजन मंडळ, तांबोळी बुवा श्री. अमित तांबोळकर यांचे सुश्राव्य भजन सादर होणार आहे. तसेच रात्रौ ठीक ०८ वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामाकिंत दशावतारी कलाकारांच्या संचात राजा रुक्मांगद हा महान पौराणिक संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
यात गणपती काका कलिंगण, राजा रुक्मानंद - लोकप्रिय राजा उदय राणे कोनसकर, इंद्र-नारायण आसयेकर, यम- प्रथमेश खवणैकर राणी - बंटि कांबळी, देवदुत - उत्कर्ष पालव मडवळ- सुहास गावडे मडवळीण- श्रीराम साहील, माळी-मंगेश साटम, कलिदेव- मास्टर दादा राणे कौनसकर विष्वमोहीनी - यश जळवी, नारद-सागर गावकर,विष्णू- अक्षय नाईक आदी कलाकार असून संगीत साथ: हार्मोनियम- मयुर गवळी मृदुंग-चंद्रकांत खोत झांज-विनायक सावंत करणार आहेत. भाविक भक्तांनी श्री पूर्वीदेवी मंदिर तळवडे-आंबाडेवाडी उपस्थित राहत तीर्थप्रसादाचा, भजनाचा व संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले आहे.