
कणकवली : राज्याच्या दौऱ्यावर असलेले उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यांवरून सरकारवर आरोप करत आहेत. या दोघांचेही आरोप हे आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केली.
प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. राणे म्हणाले, उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. या अडीच वर्षांमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काम केले? वास्तविक उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची राज्यात, मुंबईत सत्ता येणार नाही. कारण सत्ता आणण्याची त्यांची क्षमता नाही, अशीही टीका राणे यांनी केली.










