राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

Edited by: भरत केसरकर
Published on: May 04, 2024 12:15 PM
views 250  views

सिंधुदुर्ग : महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल // बांदा येथे राज ठाकरे दाखल होताच भाजप व मन सैनिकांकडून जल्लोषात स्वागत // राज ठाकरेंवर जेसीबीतून फुलांची उधळण // ढोल ताशा व फटाके फोडून केले स्वागत // स्वागत स्वीकारून राज ठाकरे कणकवली कडे रवाना // राज ठाकरे यांची महायुतीला पाठींबा दिल्यानंतर नारायण राणेंसाठी पहीलीच जाहीर सभा // राज ठाकरे व नारायण राणे तब्बल वीस वर्षांनंतर जाहीर सभेसाठी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर // काल उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या जाहीर सभेच्या ठिकाणीच राज ठाकरे घेणार सभा // राज ठाकरे आज कोणावर तोफ डागणार? याकडे लक्ष //