
सावंतवाडी : भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेत सफाई कामगारांना रेनकोटचे वाटप करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, दीपक म्हापसेकर, भाई राणे यांनी तसेच सर्व सफाई कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाची सुरुवात ही श्रावणातील पवित्र महिन्याच्या मंगळवारी गणेशचरणी मतमस्तक होऊन आज संदीप गावडे यांनी केली. राजकारण समाजकारण या सर्वांसोबत अध्यात्माची ओढ आणि भक्ती असणे गरजेचे आहे. आज वाढदिवसादिनी गणेशच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा येणाऱ्या काळात अशीच लोकांची सेवा करण्यासाठी बळ देण्याकरिता गणेशला साकडे घातले.