
देवगड : देवगड येथे अवकाळी पावसाने सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली असून. गेल्या दोन तीन दिवसांपासून वाढते तापमान तसेच अंदमान निकोबार बेटांवर मान्सून पावसाचे आगमन झाले आहे. मान्सून केरळमध्ये ३१ मे ला दाखल होणार आहे. तर कोकणात मान्सून मिरग अर्थात ७ जून ला दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र तो गेल्या काही दिवसांपासून मान्सून पुर्व पाऊस कोसळत आहे. अवकाळी पाऊस बरसला, की वीज वितरण कंपनी वीज खंडित करत असल्याचे समोर आले आहे. आज विजांचा लखलखाट ढगांचा गडगडाटा सह अवकाळी पाऊस पडला व या वेळी वीज खंडित करण्यात आली. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. संध्याकाळच्या दिवा लावण्याच्या वेळी वीज खंडित करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या पाऊसाने हजेरी लावली. आंबा बागायतदार शेतकरी, नागरिक, आंबा विक्रेते, व्यापारी यांची यामुळे धावपळ उडाली.