
सावंतवाडी : सावंतवाडी शहरासह तालुक्यात सायंकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विजांच्या लखलखाटासह पावसानं हजेरी लावल्याने बत्ती गुल झाली. शेवटच्या टप्प्यातील आंबा, काजू, फणस पिकाला पावसाचा फटका बसला.