कोकण - गोव्यात 4 दिवस पावसाची शक्यता

Edited by:
Published on: May 06, 2025 11:51 AM
views 900  views

सिंधुदुर्ग : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात  दिनांक ०६ ते ०९ मे या कालावधी दरम्यान ३० ते ४० किमी प्रति ताशी वेगाचा सोसट्याचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जने सह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.असे मुळदे येथील ग्रामीण कृषी मौसम  केंद्राने जाहीर केले आहे.   

वातावरणाच्या ट्रॉपोस्पीअर या स्तराच्या खालील व वरील पातळीमध्ये मध्य पाकिस्तान व लगतच्या पंजाब व वायव्य राजस्थान वरती पश्चिमी विक्षोभीय (Western Disturbance) वाऱ्यापासून एक चक्रीय अभिसरण निर्माण झालेले आहे.

वातावरणाच्या ट्रॉपोस्पीअर या स्तराच्या खालील पातळीमध्ये  ईशान्य राजस्थान व परिसरात ऊर्ध्व हवेचे (Upper Air Cicer) एक चक्राकार अभिसरण असून आणखी एक अभिसरण नैऋत्य राजस्थान वरती निर्माण झालेले आहे.

आग्नेय मध्य प्रदेश पासून ते मराठवाडा, तेलंगाणा व दक्षिण मध्य महाराष्ट्र ओलांडून दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा (Rain Trough) निर्माण झालेला आहे.

काढणी केलेली भात व भुईमूग पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, आंब्याची काढणी ८५ ते ९० % पक्वतेला लवकरात लवकर करावी व बागेत पडलेल्या काजू बीयांची वेचणी करून बिया सुरक्षित ठिकाणी वाळवण्यास ठेवाव्यात.असे ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.