पाऊस वाढतोय सतर्क रहा : तहसीलदार श्रीधर पाटील यांचं आवाहन

Edited by: विनायक गांवस
Published on: July 07, 2024 06:56 AM
views 424  views

सावंतवाडी : तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पुलावर पाणी आल्यास पुल ओलांडू नका अशा सूचना तेरेखोल नदी काठच्या सर्व गावांना करण्यात येत आहेत.  अनावश्यक कामा करीता घराबाहेर पडणे टाळावे. सतर्क रहा आणि सुरक्षित रहा असे आवाहन तहसीलदार सावंतवाडी तथा अध्यक्ष तालुका आपत्ती  व्यवस्थापन सावंतवाडी श्रीधर पाटील यांनी केले आहे.