अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गातील शाळांना सुट्टी

Edited by: ब्युरो
Published on: August 19, 2025 10:01 AM
views 122  views

सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५  रोजी सुट्टी जाहीर केलेली आहे.

जिल्ह्यात गेले तीन चार धुंवाधार पाऊस सुरु आहे. आणि हवामान विभागाने दिलेल्या ईशाऱ्या नुसार जिल्हा प्रशासनाने हे खबरदारीचे पाऊल उचललं आहे. त्याचं अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहिर केली आहे.