ओवळीये गावचे सुपुत्र राहुल सावंत यांची नायब सुभेदारपदी बढती

Edited by: विनायक गावस
Published on: August 04, 2023 20:37 PM
views 143  views

सावंतवाडी : ओवळीये गावचे सुपुत्र राहुल सावंत यांची भारतीय सैन्य दलात नायब सुभेदार (जेसिओ) पदी बढतीने नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय सैन्य दलातील या महत्त्वाच्या बढतीबद्दल त्यांचे दाणोली पंचक्रोशीतुन अभिनंदन होत आहे. देवसू माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले राहुल सावंत यांचे प्राथमिक शिक्षण देवसु गावातच झाले. शालेय शिक्षणापासूनच त्यांना भारतीय सैन्याविषयी आवड असल्याने त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. गेली १५ वर्षे भारतीय सैन्य दलाच्या सेवेत असलेले राहुल सावंत २००९ मध्ये बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप मध्ये भरती झाले. त्यानंतर त्यांनी जम्मू काश्मीर, पंजाब, पश्चिम बंगाल आणि सध्या पुणे येथे ते कार्यरत आहेत.