
सावंतवाडी : शहरातील संत गाडगेबाबा मंडईच्या पुनर्बांधणी दरम्यान येथील व्यापाऱ्यांच पुनर्वसन येथील ओहोळावर केलं जाणार आहे. या ठिकाणी पत्र्याच्या शेड तयार करून देण्यात आल्या आहेत. परंतु, या पत्राच्या शेडचा दर्शनी भाग हा ओपन असल्यानं पावसामुळे नुकसान होणार आहे. तसेच व्यापाऱ्यांना आपला मालाची रोज ने-आण करावी लागणार आहे. याची नगरपरिषद प्रशासनानं गांभिर्याने दखल घेत त्या शेड पूर्णपणे योग्य रित्या उभारून द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख यांनी केली आहे.
दरम्यान, अवकाळी पाऊस, वादळ कोकणात असल्यानं अशावेळी ही शेड उडून गेल्यास व लोकांना इजा झाल्यास त्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासन घेणार की ठेकेदार असा सवाल त्यांनी केला.