नुकसान झालेल्या भातशेतीची त्वरीत नुकसान भरपाई द्या !

वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने तहसीलदार प्रवीण लोकरे यांना निवेदन
Edited by:
Published on: October 19, 2022 14:23 PM
views 185  views

वेंगुर्ले : तालुक्यात सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नवीन आलेल्या आंबा मोहोराचे नुकसान झाले असून याचे परिणाम पुढे दिसून येणार आहेत. तरी शेतक-यांचे व फळ बागायतदारांच्या शेतीचे त्वरीत पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्यात यावी. असे न झाल्यास  तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार प्रवीण लोकरे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

    शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आपल्या वेंगुर्ला तालुक्याच्या भौगोलीक रचनेनुसार ७५% भाग हा भातशेती व फळबाग शेतीवरी अवलंबून आहे. त्यामुळे आजच्या स्थितीमध्ये किमान ६०% लोक हे शेती पुरक व्यावसायावर चालतो. त्यामुळे आज हातातोंडाशी आलेली भातशेती व मोहर येण्याच्या स्थितीमध्ये असलेले आंबा, काजू यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व बागायतदार या सतत पडणा-या पावसामुळे हवालदील झाले आहेत. तेव्हा सदर शेतक-यांचे व फळ बागायतदारांच्या शेतीचे त्वरीत पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्यात यावी. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई न दिल्यास वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. 

   यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगरसेवक तुषार सापळे, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, ओबीसी सेल उपजिल्हाप्रमुख निलेश चमणकर, वायंगणी सरपंच सूमन कामत, हेमंत मलबारी, डेलीन डीसोजा, प्रसाद बागायतकर, दिगंबर पेडणेकर, कासव मित्र सुहास तोरस्कर, अण्णा दाभोलकर, ज्ञानदेव वस्त, दिलीप राणे आदी उपस्थित होते.