
कणकवली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमॅट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरीता रास्तभाव दुकानांमध्ये 4G तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या आहेत. रास्तभाव दुकानामधील ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी असल्याने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यात ऑफलाईन धान्य वितरणाचे आदेश दिले होते. मात्र बुधवार ३१ जुलै २२४ रोजी सकाळपासून रेशन धान्य दुकानांवर रेशन कार्ड आणि गर्दी केली आहे. मात्र, धान्य वितरण केले जात नसल्याने सर्वसामान्य रेशन कार्डधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान यासंदर्भात रेशन धान्य दुकानदार गीतांजली कामत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, काल जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफलाइन धान्य वितरणाचे आदेश दिले. मात्र, या आदेशाच्या मागे संबंधित रेशन कार्ड धारकांचा नाव, बारा अंकी नंबर, असलेले युनिट व आवश्यक असलेली माहिती मोबाईल वरून आम्हाला कळवावी लागणार आहे. त्यामध्ये धान्य वितरण, संबंधित रेशन कार्ड धारकाचे बिल बनवायचं आणि शेवटच्या दिवशी धान्य वितरण करणे आमच्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळे शक्य होणार नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान कणकवली शहरातील दोन्ही रेशन धान्य दुकानांवर रेशन कार्ड धारक आणि मोठी गर्दी केली आहे ऑनलाइन धान्य वितरणाच्या प्रक्रियेमुळे अनेकदा येऊन देखील आपल्याला धान्य मिळालं नाही ऑफलाइन धान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करून देखील आम्हाला धान्य मिळत नसल्याने काय करायचे अशी संतप्त प्रतिक्रिया रेशन कार्ड धारकांचे आहे. कणकवली शहरातील रेशन कार्ड धान्य दुकानांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे, याबाबत तातडीने प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.