कणकवलीत गॅस सिलेंडर साठी रांगा..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 27, 2024 07:09 AM
views 553  views

कणकवली : कणकवलीत घरगुती गॅस सिलेंडर साठी शुक्रवारी सकाळी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. मागील काही दिवस ट्रान्सपोर्ट कंपनी  तसेच चालंकाचा संप होता. त्यामुळे सिंधुदुर्गासह कणकवली तालुकामध्ये पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. अजूनही तो परिणाम कणकवलीकरांना जाणवत आहे. कणकवली मध्ये दिवसाला दोन लोड म्हणजे ६०० सिलेंडर चा पुरवठा होतो. पण सध्या एकच लोड  घरगुती गॅस सिलेंडरच्या येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात गॅसचा  तुटवडा ग्राहकांना जाणवत असून  ग्राहकांच्या रांगा या सिलेंडर घेण्यासाठी लागल्या असल्याचे कणकवली शहरात दिसून येत आहे.