देवगड एसटी आगाराच्या डागडुजी कामाबाबत प्रश्नचिन्ह

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 04, 2024 08:34 AM
views 86  views

देवगड : इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स अंबेसिडर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने देवगड आगार व्यवस्थापक निलेश लाड यांची भेट घेऊन देवगड बस स्थानकाच्या पुनर्बांधणी दुरुस्तीचे कामाबाबत चर्चा केली. देवगड बसस्थानकाची इमारत जुनी जीर्ण झाली असून या इमारतीच्या पुनर्बांधणी दुरुस्तीकरिता सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला व सद्यस्थितीत हे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे .एकंदरीत पाहता पूर्वीची असलेल्या इमारतीचे प्लॅस्टर काढून नवीन प्लास्टर करणे या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामाची प्रगती दिसून येत नाही .वास्तविक पाहता ही इमारत जुनी झाली असून या इमारतीतील आतल्या लोखंडी शिगा या सडून गेल्या आहेत व त्याच कामावरील जुने प्लास्टर काढून त्या ठिकाणी नव्याने प्लॅस्टर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. वास्तविक इमारत पूर्णतः पाडण्यात येऊन नव्याने त्या ठिकाणी इमारत बांधणे गरजेचे होते. परंतु हे दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे निदर्शनाचे येतात या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापन यांची भेट घेऊन या कामकाजाविषयी सविस्तर माहिती घेतली व त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या कागदपत्रांची देखील मागणी व या कामाची सविस्तर माहिती मिळावी असे या चर्चेत सांगितले.

त्याचबरोबर तालुक्यातील काही ग्रामीण फेऱ्यांबाबत देखील या चर्चेत उहापोह करण्यात आला यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्याम कदम, माजी तालुकाध्यक्ष दयानंद तेली,तालुका उपाध्यक्ष विलास रुमडे, जिल्हा कार्याध्यक्ष दीपिका मेस्त्री,पोलीस संरक्षण कायदा अध्यक्ष विजय कदम, मीडिया अध्यक्ष, दयानंद मांगले , महिला अध्यक्ष शामल जोशी ,तालुका समन्वयक रवी चांदोस्कर शिक्षण विभाग अध्यक्ष तुकाराम तेली,आनंद देवगडकर उपस्थित होते. या चर्चेत आपल्या आवश्यक असणाऱ्या माहिती संघटनेला लेखी देण्यात येईल व त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी दिले.