
दोडामार्ग : गोवा राज्यात सिंधुदुर्ग व चंदगड कोल्हापूर येथून येणारी बॉयलर कोंबडीचा दर्जा खाण्या लायक असावा. या उद्देशाने प्रेसिडेंट ऑल गोवा पोल्ट्री शॉपकीपर असोसिएशन ही संघटना स्थापन केली. याला सिंधुदुर्ग व चंदगड कोल्हापूर येथील शेतकरी व विक्रेत्यांनी पाठिंबा दर्शवीत गोवा येथील बॉयलर पोल्ट्री फार्म असोसिएशनच्या पाठीशी असल्याचे त्यांनी जाहीर केले.
दोडामार्ग येथील चंदू रॉयल फार्म येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत गोवा, सिंधुदुर्ग, चंदगड येथील पोल्ट्री फार्म शेतकरी मोठ्या संखेने उपस्तित होते. यावेळी प्रीस्को sequeira, जयकृष्णा नाईक, चंदगड चे तुकाराम धुरी, सिंधुदुर्ग पोल्ट्री फार्म अध्यक्ष सचिन शेळले यांनी सर्वानूमते आपण गोव्यातील या संघटलनेला पाठिंबा देणार असून या संघटणेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग व चंदगड येथील बॉयलर कोंबडी विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारण सिंधुदुर्ग व गोव्यातील काही कंपनी बॉयलर कोंबडीच्या व्यवसायाखाली स्वतःला जास्त फायदा घेत असून शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम मिळते. सिंधुदुर्ग येथील रॉयल फूड या कंपनीने बॉयलर पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांकडून कमी दरात पक्षी खरेदी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप येथील जिल्हा पोल्ट्री फार्म संघटनेचे अध्यक्ष सचिन शेळके यांनी केला आहे. तर गोव्यातील अंबिका, पार्सेकर, लॉरेन्स फूड कलंगुट यासारख्या कंपन्या या सर्व शेतकऱ्यांना लुबाडून आपल्या मर्जीतील मार्केट दर लावून आपला फायदा करून घेत आहे, असा आरोप ऑल गोवा पोल्ट्री संघनेचे अध्यक्ष प्रिस्को यांनी केला आहे. तसेच सिंधुदुर्ग, चंदगड येथील पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांनी अशा लुबाडणूक करणाऱ्या कंपनी बरोबर आपला व्यवहार करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
गोवा सीमेवर तपासणी नाका ?
दरम्यान, ऑल गोवा पोल्ट्री संघनेचे अध्यक्ष प्रिस्को म्हणाले की सिंधुदुर्ग व चंदगड कोल्हापूर येथून येणाऱ्या बॉयलर कोंबडी ची तपासणी व्हावी. त्यांना बारकोड देण्यात संदर्भात गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा सूरु आहे. जेणे करून गोव्याला येणारे चिकन हे खाण्यालायक यावे यासाठी हा सर्व खाटाटोप सुरु आहे. त्यासाठी गोवा सीमेवर तपासणी नाके सरकारने बसवावे व सिंधुदुर्ग व चंदगड या ठिकाणाहून येणाऱ्या बॉयलर कोंबड्या चे दिलेले बारकोड तपासुन मगच त्या कोंबड्या गोव्यात सोडाव्यात अशी मागणी सरकारकडे केलेली आहे. त्यासाठी सरकारही या संघटनेच्या पाठीशी आहे असे त्यांनी सांगितले .
आत्मनिर्भर गोवा बनवण्यासाठी सहकार्य करा :- जय कृष्णा नाईक
गोवा पोल्ट्री फार्मचे जय कृष्णा म्हणाले की भारताचे पंतप्रधान म्हणतात आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे आपला गोवा आत्मनिर्भर गोवा बनवण्यासाठी आमच्या सारखे बेरोजगार युवक पोल्ट्री फार्म या व्यवसा्याकडे वळत आहेत. हा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने आम्ही ही गोवा पोल्ट्री फार्म संघटना तयार केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून या उद्योगाला योग्य बाजार भाव मिळावा. तसेच प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने गोव्यात योग्य पद्धतीचा व खाण्या लायक माल यावा यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले आहे.