मळेवाड - कोंडुरे ग्रामपंचायतला क्यूआर कोड सुपूर्द

Edited by: विनायक गावस
Published on: September 06, 2023 15:16 PM
views 185  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे येथे जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते क्यूआर कोड सरपंच मिनल पार्सेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.     

शासनाने ग्रामपंचायतकडील पाणीपट्टी,घरपट्टी व इतर शुल्क हे प्राधान्याने डिजिटल पेंमेटचा वापर करुन भरावे असे आदेश दिले होते. त्यालाच अनुसरुन जिल्ह्यातील ग्रामपंचायतना सिंधुदुर्ग जिल्हा बॅंककडून क्यूआर कोड देण्यात येत आहेत.ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सरपंच मिनल पार्सेकर यांच्याकडे घरपट्टी व पाणीपट्टीसाठी स्वतंत्र किंवा आर कोड प्रदान केले आहेत.यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष दळवी यांनी मनोगत व्यक्त करत असताना जिल्हा ही जिल्ह्यातील शेतकरी महिला,बचत गट,संस्था,व्यवसायिक,उद्योजक यांचे हात बळकट करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.आता मोठ्या प्रमाणात डिजिटल पेंमेटने व्यवहार होत असून ग्रामपंचायत मधील व्यवहार डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेतल्याने ग्रामपंचायतचे विशेष कौतुक केले.तसेच बॅंकेच्या अनेक योजना आहेत त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी संचालक रविंद्र मडगावकर,उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, स्नेहल मुळीक,अमोल नाईक, अर्जुन मुळीक, कविता शेडगे, शाखा व्यवस्थापक लक्ष्मण गावडे, अमित नाईक अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.