पुरळ ग्रामपंचायत सदस्याचा भाजपा प्रवेश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 15, 2024 14:10 PM
views 363  views

देवगड : उबाठा सेनेच्या पुरळ ग्रामपंचायत सदस्य बाळू रत्नाकर मुळम यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उबाठा सेनेला नेता शिल्लक नसल्याने व आमदार नितेश राणे यांनी आणलेला विकासाच व्हिजन, आमदार नितेश राणे हेच माझ्या गावचा विकास करू शकतात हे मला माहित झाल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे असे मुळम यांनी सांगितले.

यावेळी रवींद्र तिर्लोटकर, माजी उपसभापती, संदीप देवळेकर, शक्ती केंद्रप्रमुख पुरळ संतोष पुजारे, महेश वानिवडेकर आदी उपस्थित होते.