शुद्ध - गुणवत्तापुर्ण पाण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे !

निलेश मठकर यांचे प्रतिपादन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 07, 2024 14:04 PM
views 103  views

देवगड : देवगड येथील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कायम रहावी यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पाणी गुणवत्ता निरीक्षक निलेश मठकर यांनी केले.

जल जिवन मिशन अंतर्गत तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण देवगड इंद्रप्रस्थ सभागृहात संपन्न झाले . या प्रशिक्षणाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने पाणी गुणवत्ता निरीक्षक निलेश मठकर यांनी केले.

यावेळी पंचायत समिती देवगड अधिक्षक मेधा राणे, आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु, आरोग्य विस्तार अधिकारी अडुळकर , कट्टा सरपंच श्वेता कोयंडे, वरीष्ट सहाय्यक स्वप्नजा बिर्जे, पाणी गुणवत्ता सल्लागार नागेश तोरस्कर, अणुजैव तज्ञ कणकवली लॅब रसिका पिळणकर, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर, डाटा ऑपरेटर मोहीनी खडपकर आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी पाणी गुणवत्ता निरीक्षक यांनी निलेश मठकर यांनी पिण्याचे पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण लाल कार्ड , पिवळे कार्ड , हिरवे कार्ड याबाबत मार्गदर्शन तर पाणी गुणवत्ता सल्लागार नागेश तोरस्कर यांनी पाणी गुणवत्ता विषयक शासन निर्णय याबाबत मार्गदर्शक तर अणुजैव तज्ञ रसिका पिळवणकर यांनी पाणी नमुने तपासणीचे माणके , रासायनिक व जैविक पाणी नमुने तपासणी मोहीम  याबाबत मार्गदर्शन केले 

या कार्यक्रमात ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे प्रस्ताविक आरोग्य विस्तार अधिकारी  प्रतिमा वळंजु तर आभार समुहसमन्वयक विनायक धुरी यांनी मानले.