
वैभववाडी : तालुका खरेदी विक्री संघामार्फत केल्या जाणाऱ्या भात खरेदीचा शुभारंभ मंगळवार (ता. २४ डिसेंबर) सकाळी १०.वा. करण्यात येणार आहे. शहरातील संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांकडील भात खरेदी याहीवर्षी केली जाणार आहे.याचा मंगळवारी शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे व्यवस्थापक सिद्धेश रावराणे यांनी केले आहे.