पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचा आदर्श घेऊन अनेक तरुण सैन्यात भरती : भरत गावडे

Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2024 11:17 AM
views 221  views

सावंतवाडी : पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांनी लष्करी सेवेत केलेली कामगिरी, युद्धातील आघाडी, शौर्य, पराक्रम  अतुलनिय कामगिरी याचा आदर्श घेऊन सावंतवाडी संस्थानातील त्या काळात २,२९१ तरुण सैन्यात भरती झाले होते. तीच परंपरा चौकूळ, आंबोली, वेर्ले, शिरशिंगे गावात आहे. त्यांचाच आदर्श सैनिकी परंपरेला आहे असे प्रतिपादन भरत गावडे यांनी केले.

बापूसाहेब महाराजांच्या ८७ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून चौकूळ इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्याल, चौकूळ येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन  साटम महाराज वाचन मंदिर, दाणोली या संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक बापू गावडे, गावचे मानकरी सोनू गावडे, विठठल गावडे, अर्जुन गावडे, प्रा. मधुकर गावडे, जि.प शाळा चौकुळ नं.१ च्या मुख्याध्यापिका शीतल गावडे, मुख्खाध्यापक संजय पाटील, विजय पाटील आदी होते.मान्यवरांच्या हस्ते बापूसाहेब महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले त्यानंतर प्रमुख वक्ते भरत गावडे यांनी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचे कृषिविषयक, आरोग्य विषयक धोरण व जीवन चरित्र विषद केले. 

यावेळी ओम अवधुतानंद सेवा मंडळ, धवडकी या संस्थेच्या वतीने शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य दिले. त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने गुणवंत विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. जनसेवा ट्रस्ट बांदा या संस्थेच्या वतीने सहा मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक शिक्षण प्रेमी उपस्थित होते. कु. वेदिका गावडे, पौर्णिमा गावडे, सुरज गावडे, उर्वी नार्वेकर यांनी मनोगते व्यक्त केली. संजय पाटील यांनी आभार मानले‌